Sun, Jan 29, 2023

मुंबईत ५७ वर्षीय महिलेचे अवयवदान
मुंबईत ५७ वर्षीय महिलेचे अवयवदान
Published on : 7 December 2022, 12:34 pm
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईत मंगळवारी (ता. ६) ४३ वे यशस्वी अवयवदान झाले. यामध्ये ५७ वर्षीय महिलेने यकृत आणि दोन्ही किडन्या दान केल्या आहेत. या महिलेला प्रकृतीच्या कारणामुळे नवी मुंबईतील एमजीएम न्यू बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही या महिलेचे प्राण वाचू शकले नाहीत. त्यामुळे अवयव समन्वयकांनी महिलेच्या कुटुंबियांना अवयव दानासाठीचे समुपदेशन केले. त्यानुसार महिलेच्या कुटुंबियांनी सकारात्मकता दाखवत अवयवदान करण्यास परवानगी दिली. त्यानुसार महिलेचे यकृत आणि दोन्ही किडन्या दान केल्या आहेत. सर्व अवयवदान झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.