महिलेच्या गर्भाशयातून काढला दीड किलोचा फायब्राईड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेच्या गर्भाशयातून काढला दीड किलोचा फायब्राईड
महिलेच्या गर्भाशयातून काढला दीड किलोचा फायब्राईड

महिलेच्या गर्भाशयातून काढला दीड किलोचा फायब्राईड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : बोईसर येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय एका महिलेच्या गर्भाशयातून दीड किलोचा फायब्राईड (गर्भाशयात किंवा गर्भाशयाच्या बाजूला तयार होणारी गाठ) काढण्यात डॉक्टरांना यश आले.

मिरा रोडच्या रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ, तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. राजश्री तायशेटे-भासले यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलेच्या दोन्ही प्रसूती सिझेरियन झाल्या. तिच्या दुसऱ्या प्रसूतीनंतर तिला तीव्र ओटीपोटात दुखणे आणि मेनोरेजिया किंवा मासिक पाळीच्या दरम्यान असामान्य आणि जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. तिने स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला. स्थानिक डॉक्टरांनी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टोमीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली.


विशेष काळजी घेणे आवश्‍यक
विशीनंतर स्त्रियांनी नियमित स्त्रीरोग तपासणी करून घेणे गरजेचे आहे. जवळपास आठ तास हा त्रास सहन केला. शेवटी वेदना असह्य झाल्यावर तज्ज्ञांकडे धाव घेतली व तातडीने उपचार केले. मी आता वेदनामुक्त आहे आणि माझी दैनंदिन कामे सहजतेने करू शकते, असे रुग्णाने सांगत डॉक्टरांचे आभार मानले.


एक टक्‍क्‍याहून कमी महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. मूत्रवाहिनी जवळ असल्यामुळे कुशल शस्त्रक्रियेची गरज असते. फायब्रॉईड तिच्या मूत्रमार्गावर दबाव आणत होता आणि तिच्या किडनीवर परिणाम करत होता. म्हणून आम्ही लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी करण्याचे ठरवले. या प्रक्रियेदरम्यान पाच मिमी कॅमेऱ्यासह तीन पोर्ट वापरण्यात आले, ज्याला आम्ही मिनिमल पोर्ट आणि मिनिमल एक्सेस सर्जरी असे म्हणतो. ही एक डागविरहित शस्त्रक्रिया होती. दीड किलो वजनाचा १० सेंमी लांबीचा फायब्रॉईड काढण्यात यश आले.
- डॉ. राजश्री तायशेटे-भासले, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ