
गुजरातमधील विजयाचा उल्हासनगरात जल्लोष
उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने रेकॉर्डब्रेक करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. या विजयाचा उल्हासनगरातील भाजपने पेढे आणि लाडू वाटून जल्लोष साजरा केला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नेहरू चौकात साजऱ्या करण्यात आलेल्या या जल्लोषात जिल्हाध्यक्ष जमनू पुरसवानी, माजी महापौर मीना कुमार आयलानी, माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, संघटन मंत्री मनोहर खेमचंदानी, माजी नगरसेवक महेश सुखरामनी, प्रदीप रामचंदानी, चार्ली पारवानी, परिवहन समिती सभापती सुभाष तानवडे, माजी नगरसेविका अर्चना करणकाळे, व्यापारी अध्यक्ष दीपक छतलानी, होम नारायण वर्मा, अजित सिंग लबाना, महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी मढवी, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष फुलचंद यादव, कपिल अडसूळ, ऋषिकेश मिश्रा, लखी नाथानी, मंडळ अध्यक्ष विक्की मेंगवानी, चंद्रशेखर यादव आदींसह महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.