Sun, Feb 5, 2023

वसई-विरार मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेची विशेष लोकल
वसई-विरार मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेची विशेष लोकल
Published on : 9 December 2022, 3:24 am
मुंबई : वसई-विरार मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेने रविवारी (ता. ११) पहाटे विशेष लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विरार ते चर्चगेटदरम्यान दोन अतिरिक्त लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे वसई-विरार मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेट ते विरार पहिली विशेष लोकल पहाटे तीन वाजता चर्चगेट स्थानकांवरून सुटेल आणि पहाटे ४.३५ वाजता विरार स्थानकावर पोहचणार आहे; तर दुसरी विशेष लोकल पहाटे ३.३० वाजता चर्चगेट स्थानकांवरून सुटेल आणि पहाटे ५.०५ वाजता विरार स्थानकावर पोहचणार आहे.