Fri, Jan 27, 2023

पासपोर्ट कार्यालये तीन शनिवारी खुली
पासपोर्ट कार्यालये तीन शनिवारी खुली
Published on : 9 December 2022, 5:00 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, मुंबई अंतर्गत येणारी सर्व कार्यालये पुढील तीन शनिवारी पासपोर्ट अर्ज प्रक्रियेसाठी खुली राहणार आहेत. नागरिकांना लवकर पासपोर्ट अपॉईंटमेंट उपलब्ध करून देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय मुंबई अंतर्गत सर्व कार्यालये पुढील तीन शनिवारी म्हणजे १०, १७ आणि २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० पर्यंत पासपोर्ट अर्ज प्रक्रियेसाठी खुली राहतील. पासपोर्ट कार्यालयात १० डिसेंबर २०२२ च्या भेटीसाठी नोंदणी ऑनलाईन उपलब्ध आहेत. १७ डिसेंबर आणि २२ डिसेंबर २०२२ च्या अपॉइंटमेंट्स अनुक्रमे १४ डिसेंबर आणि २१ डिसेंबर २०२२ रोजी उपलब्ध असतील.