लोकसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात आणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात आणा
लोकसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात आणा

लोकसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात आणा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : लोकसंख्या वाढीमुळे मूलभूत गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुळे एक कुटुंब एक मूल धोरण प्रस्तावित करून, तत्काळ लोकसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात आणावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.

लोकसंख्यावाढीमुळे मूलभूत गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. अन्नधान्याचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे तांदूळ, गहू सोडल्यास खाद्यतेलाची आयात करावी लागते. रस्ते, पूल आणि प्रवासी वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मोठ्या प्रमाणात घरे बांधणीसाठी शेतजमिनी अधिग्रहीत केल्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली. याशिवाय मराठी भाषेला अभिजात (शास्त्रीय) भाषेचा दर्जा ताबडतोब देण्याची मागणी त्यांनी केली.