तळागाळातील मुलांवर मोफत नेत्र उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळागाळातील मुलांवर मोफत नेत्र उपचार
तळागाळातील मुलांवर मोफत नेत्र उपचार

तळागाळातील मुलांवर मोफत नेत्र उपचार

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : भारतातील मोठ्या शहरांतील अल्प उत्पन्न गटातील मुलांच्याही हातात मोबाईल आल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे; मात्र त्याची जाणीवच त्यांना आणि त्यांच्या पालकांना होत नसल्याचे गंभीर चित्र आहे. अशा मुलांच्या नेत्र उपचारांवर आयसीआयसीआय लोंबार्डतर्फे भर देण्यात येत आहे.
कंपनीतर्फे सीएसआर योजनेतून ‘केअरिंग हॅण्ड्स’ उपक्रम सलग ११ वर्षे राबवण्यात येत आहे. वर्षभरात त्यांनी देशातील ५० शहरांतील चारशे सरकारी शाळांमधील सुमारे तीन लाख मुलांची नेत्रतपासणी करून त्यांना विनामूल्य चष्मे दिले आहेत. आयसीआयसीआय लोंबार्डच्या सीएसआर विभागप्रमुख शीना कपूर यांनी त्याबाबत ‘सकाळ’ला माहिती दिली.

आज प्रत्येक मुलाच्या हातातही मोबाईल आला आहे. अल्प उत्पन्न गटातील मुलेही त्याला अपवाद नाहीत. मुलांचे कित्येक तास मोबाईलवर जात असल्याने लहान वयातच त्यांना चष्मा लागण्याचे वा डोळ्यांच्या समस्या उद्‍भवण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनाही अशा समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. तेवढी त्यांची जाणीवही नसते. आपल्याला चष्मा लागला आहे किंवा डोळ्यात काही समस्या निर्माण झाली आहे, हे मुलांना कळतही नाही. कळते तेव्हा फार उशीर झालेला असतो, असा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. कंपनीचे तीन हजार कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी ‘केअरिंग हॅण्ड्स’ उपक्रमात स्वयंस्फूर्तीने भाग घेतात. मुलांना भेटवस्तू दिल्या जात असल्याने या कर्मचाऱ्यांनाही समाजासाठी काही तरी चांगले काम केल्याचे समाधान मिळते, असे शीना कपूर म्हणाल्या. अशाच एका शिबिरात एका तासात १,५२६ मुलांची नेत्रतपासणी केल्याचा विक्रम गिनीज रेकॉर्डमध्येही नोंदवला गेला आहे.