अर्ज स्वीकृतीस मुदत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्ज स्वीकृतीस मुदत वाढ
अर्ज स्वीकृतीस मुदत वाढ

अर्ज स्वीकृतीस मुदत वाढ

sakal_logo
By

विरार, ता. ११ (बातमीदार) : वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, महोत्सवातील प्रवेशासाठी प्रवेश अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे; पण वसई तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांच्या विनंतीनुसार ३१ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्यात आली असून आता गुरुवार १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या कला क्रीडा महोत्सव समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला विरारमधील प्रख्यात डॉ. प्रदीप देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली. या बैठकीत कबड्डी, खो -खो आणि लंगडी या क्रीडा प्रकाराचे मूल्यांकन तारखेतही बदल करण्यात आला असून हे मूल्यांकन २०, २१ आणि २२ डिसेंबरला क्रीडा भवनात होणार आहे. या बैठकीला सरचिटणीस प्रकाश वनमाळी, संतोष वळवईकर, केवल वर्तक, अनिल वाझ, ज्यूड डिसोजा, प्रशांत घुमरे, राजेश जोशी, विनायक पंडित, योगेश चौधरी आणि मुग्धा लेले आदी उपस्थित होते.