कुडूस येथे बुधवारी पादुका सोहळ्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडूस येथे बुधवारी पादुका सोहळ्याचे आयोजन
कुडूस येथे बुधवारी पादुका सोहळ्याचे आयोजन

कुडूस येथे बुधवारी पादुका सोहळ्याचे आयोजन

sakal_logo
By

वाडा, ता. ११ (बातमीदार) : जगद्‍गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुका दर्शन व गुरुपूजन सोहळ्याचे बुधवारी (ता. १४) आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तालुक्यातील कुडूस येथे सहारा हॉटेलजवळ भिवंडी-वाडा महामार्गालगत होणार आहे. पालघर जिल्ह्यातील नरेंद्राचार्य अनुयायांकडून होणाऱ्या सोहळ्यासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू असून जय्यत तयारी केली जात आहे. तसेच भक्तगणांकडून तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यक्रमाची जनजागृती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नरेंद्राचार्य स्व-स्वरूप संप्रदायाचे पालघर जिल्ह्यात अनुयायींचे पूर्व व पश्चिम असे विभाग आहेत. पूर्व विभागात जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा; तर पश्चिम विभागात डहाणू, पालघर, वसई, तलासरी हा भाग येतो. ग्रामीण भागातील जनतेला आध्यात्मिक ज्ञानाची पर्वणी मिळावी म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात श्रींच्या पादुकांचे दर्शन, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, पुष्पवृष्टी व सामाजिक उपक्रमांतर्गत गरजूंना घरघंटीचे वाटप करण्यात येणार आहे. या दर्शन सोहळ्यात दहा हजार भक्तगणांच्या बैठकीची व्यवस्था केली आहे.