शिवसेनेचा पालिकेवर धडक मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचा पालिकेवर धडक मोर्चा
शिवसेनेचा पालिकेवर धडक मोर्चा

शिवसेनेचा पालिकेवर धडक मोर्चा

sakal_logo
By

विरार, ता. ११ (बातमीदार) : गेल्या दोन-अडीच वर्षांत विविध विकासकामांच्या नावे वसई-विरार महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मंगळवारी (ता. १३ डिसेंबर) धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. विरार पूर्व आर. जे. हॉटेल येथून सकाळी १० वाजता महापालिका मुख्यालयावर हा मोर्चा निघेल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे. महापालिकेची मुदत मार्च २०२० रोजी संपलेली आहे. या कालावधीपासून पालिकेवर आयुक्तांचीच प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे; पण मागील दोन-अडीच वर्षांत पालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आलेली आहेत; मात्र या कामांत प्रचंड अनियमितता आणि भ्रष्टाचार झालेला आहे. अनियमित पाणीपुरवठा, रस्त्यांची झालेली दुरवस्था, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा यामुळे वसई-विरारकर त्रस्त आहेत. त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समाजसेवक व सामान्य नागरिकांना पालिका अधिकारी जुमानत नाहीत. त्यांच्या तक्रारींवर कार्यवाही होत नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.