टीईटीउत्तीर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना पालिका सेवेत नियमित करण्याची शिक्षक सेनेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीईटीउत्तीर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना पालिका सेवेत नियमित करण्याची शिक्षक सेनेची मागणी
टीईटीउत्तीर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना पालिका सेवेत नियमित करण्याची शिक्षक सेनेची मागणी

टीईटीउत्तीर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना पालिका सेवेत नियमित करण्याची शिक्षक सेनेची मागणी

sakal_logo
By

टीईटी उत्तीर्ण शिक्षण सेवकांना
पालिका सेवेत नियमित करा
शिक्षक सेनेची मागणी
मुंबई, ता. ११ (बातमीदार) : महापालिका प्राथमिक आणि खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमध्ये पाचसहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि मार्च २०१९ नंतर राज्य शासनाने घेतलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या सर्व शिक्षण सेवकांना त्वरित सेवेत नियमित करावे, अशी मागणी मुंबई महापालिका शिक्षक-शिक्षकेतर सेनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक के. पी. नाईक यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि पालिका आयुक्तांना त्यांनी त्याबाबत एक निवेदनही दिले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर यांनीही आयुक्तांना पत्र लिहून पालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या टीईटी उत्तीर्ण दोनशेहून अधिक शिक्षण सेवकांना सेवेत नियमित करण्याची मागणी केली आहे.
पालिकेच्या शाळांमध्ये अनेक शिक्षक शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यापैकी शासनाने मार्च २०१९ ते जानेवारी २०२१ दरम्यान घेतलेल्या महाटीईटी परीक्षेत २०० हून अधिक शिक्षण सेवक उत्तीर्ण झाले आहेत; परंतु ते अद्याप शिक्षण सेवक म्हणूनच कार्यरत आहेत. शिवाय जानेवारी २०२१ पासून त्यांचे वेतनही बंद असल्याच्या गंभीर बाबीकडे सचिन अहिर आणि के. पी. नाईक यांनी पालिका आयुक्त व राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे. मार्च २०१९ नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या २०० हून अधिक शिक्षण सेवकांना नियमित करण्याबाबत त्या त्या शाळांना आदेश द्यावेत, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. केंद्रीय शिक्षा राज्यमंत्र्यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून टीईटी उत्तीर्ण शिक्षण सेवकांना सेवेत नियमित करण्याबाबत आपल्या स्तरावर प्रश्न निकालात काढावा असे आदेश दिले होते. नाईक यांनी राज्य आणि पालिका प्रशासनाचे त्याकडे लक्ष वेधले आहे.