मानपाडा रस्ते कामासाठी वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानपाडा रस्ते कामासाठी वाहतुकीत बदल
मानपाडा रस्ते कामासाठी वाहतुकीत बदल

मानपाडा रस्ते कामासाठी वाहतुकीत बदल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ ः गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या डोंबिवलीतील मानपाडा रस्त्याचे सीमेंट काँक्रीटीकरणाचे काम येत्या तीनचार दिवसांत हाती घेतले जाणार आहे. रस्त्याच्या कामासाठी मानपाडा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मानपाडा रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांना व्हावी यादृष्टीने सध्या वाहतूक विभागाने तसेच सूचनाफलक लावण्यास सुरुवात केली आहे. मानपाडा रस्ते कामास अखेर सुरुवात होणार असून हे काम मार्गी लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
मानपाडा चौक ते साईबाबा सागाव चौक रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी डोंबिवली पूर्व, पश्चिम, पी ॲण्ड टी कॉलनी, साईबाबा सागाव, नांदिवली स्वामी समर्थ मठ, नांदिवली टेकडी परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम सुरू होण्यासाठी तीन ते चार दिवस प्रवाशांना सूचना देणे आवश्यक असल्याने त्यासाठी काही फलक या भागात लावण्यात आले आहेत. शासनाकडे वाहतुकीतील बदलांची माहिती देण्यात आली असून त्याविषयीची अधिसूचना लवकरच येईल असेही वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

........................
पर्यायी मार्ग
१ - शिळफाटा, कल्याण फाटा, मुंबई ठाण्याकडून, डोंबिवली पूर्व पश्चिम, पी. एन. टी. कॉलनी, साईबाबा सागाव नांदिवली स्वामी समर्थ मठ, नांदिवली टेकडी येथे जाणाऱ्या सर्व वाहनधारक मानपाडेश्वर मंदिराचे बाजुने दिवा संप रोड, एच. पी. गॅस गोडावून, वालमेट - कंपनी गार्डियन कॉलेज, शांतिनिकेतन येथून भोपर रोडने गजानन पाटील चौक नांदिवली तलाव स्वामी समर्थ मठ पी. एन. टी. चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील.
२ - स्वामी समर्थ मठ पी. एन. टी. चौक-डोबिवली पूर्व पश्चिम येथील वाहनधारक नांदिवली तलाव, गजानन पाटील चौक, शांतिनिकेतन येथून भोपर रोडने गार्डीयन कॉलेज वालमेट कंपनी एच. पी. गॅस गोडावून दिवा संबंध रोडने मानपाडेश्वर मंदिरमार्गे शिळफाटा, कल्याण फाटा, मुंबई ठाणे येथे जातील.