पश्चिम रेल्वेवर सलून, रेस्टॉरंट ऑन व्हील? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेवर सलून, रेस्टॉरंट ऑन व्हील?
पश्चिम रेल्वेवर सलून, रेस्टॉरंट ऑन व्हील?

पश्चिम रेल्वेवर सलून, रेस्टॉरंट ऑन व्हील?

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेच्या स्थानकांत सलून आणि रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू होणार आहे. त्याकरिता पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. नव्या वर्षात प्रमुख पाच स्थानकांत सलून आणि दोन स्थानकांबाहेर रेस्टॉरंट ऑन व्हील प्रवासी पर्यटकांसाठी सुरू करण्यात येतील.
भारतीय रेल्वेने महसूल वाढवण्यासाठी ‘न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडियाज स्कीम’ आणली आहे. त्यामार्फत प्रवासी व्यतिरिक्त महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे सुरू केले आहे. त्यानुसार, रेल्वेस्थानकांवर रेस्टॉरंट ऑन व्हील, सलून, शॉपिंग मॉल, मॅजिक मिरर इत्यादींसारखे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यातून भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपये महसूल मिळत आहे. मध्य रेल्वेने गेल्या काही महिन्यांपूर्वीच सीएसएमटी रेल्वेस्थानकात सलून आणि रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू केले आहे. त्यातून मध्य रेल्वेला लाखो रुपये महसूल मिळत असून प्रवाशांना सुविधा मिळत आहे. आता पश्चिम रेल्वेसुद्धा आपल्या पाच प्रमुख स्थानकांवर सलून सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. दोन रेल्वेस्थानकांवर रेस्टॉरंट ऑन व्हीलसाठी प्रयत्न सुरू आहेत.

नव्या वर्षात सुरू होणार सुविधा
पश्चिम रेल्वे मार्गावरील निवडक स्थानकांमध्ये अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामध्ये मुंबई सेंट्रल, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली आणि बोरिवली स्थानकांचा समावेश आहे. ब्युटी पार्लर युनिसेक्स म्हणजेच पुरुष आणि महिला दोघांसाठी असणार आहेत. त्या संदर्भात पश्चिम रेल्वेतर्फे निविदा काढण्यात आलेल्या नाही.