मेट्रो प्रवासासाठी खिशाला झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो प्रवासासाठी खिशाला झळ
मेट्रो प्रवासासाठी खिशाला झळ

मेट्रो प्रवासासाठी खिशाला झळ

sakal_logo
By

खारघर, ता. १३ (बातमीदार) : पेंधर ते सेंट्रल पार्कदरम्यान धावणाऱ्या नवी मुंबई मेट्रोची नुकतीच ट्रायल घेण्यात आली आहे. एकीकडे नवी मुंबईकरांसाठीची मेट्रो दृष्टिपथात आल्याने प्रवास सुखकर होणार आहे; पण दुसरीकडे मेट्रो प्रवासासाठी होणाऱ्या खर्चावरून नाराजीचे सूर उमटत आहेत.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सेंट्रल पार्क ते उत्सव चौक स्थानकादरम्यान महामेट्रोने घेतलेल्या ट्रायल रनचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांनी नवी मुंबई मेट्रोचे ट्विट केले होते. या वेळी शून्य ते दोन किलोमीटर पर्यंत १० रुपये, दोन ते चार किलोमीटरपर्यंत १५ रुपये आणि चार ते सहा किलोमीटरपर्यंत २० रुपये असे दरपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे पेंधर ते सेंट्रल पार्क या सहा किलोमीटरच्या अंतरासाठी प्रवाशांना माफक दरात प्रवास करता येणार आहे. पण तळोजावरून खारघर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांना एनएमएटीसाठी २० रुपये मोजावे लागत आहेत. तर सेंट्रल पार्कचे मेट्रो स्थानक ते खारघर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांना रिक्षा भाड्यापोटी ५५ ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे मेट्रोचा हा प्रवास म्हणजे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड ठरण्याची भीती असल्याने सिडकोने योग्य भाडे आकारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याविषयी सिडकोचे जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.
-------------------------
तळोजा वसाहतीत सर्व सामान्य नागरिक वास्तव्य करीत आहे. काही दिवसांत मेट्रो सुरू होणार आहे. मात्र सिडकोने प्रवासभाडे दुप्पट लावले आहे. सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनपासून खारघर रेल्वे स्थानक तीन किलोमीटर; तर कोपरा बस थांबा दोन किलोमीटरवर आहे. त्यामुळे पुन्हा रिक्षाने प्रवास करावा लागणार आहे.
- राजीव सिन्हा, रहिवासी, तळोजा