ऐरोली खाडीकिनारा परिसर चकाचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोली खाडीकिनारा परिसर चकाचक
ऐरोली खाडीकिनारा परिसर चकाचक

ऐरोली खाडीकिनारा परिसर चकाचक

sakal_logo
By

वाशी, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेकडून स्वच्छ भारत अभियान २०२३ अंतर्गत ऐरोली विभाग कार्यालय आणि निर्धार फांऊडेशन यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात एक क्विंटल सुका कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला.
आशिया खंडातील सर्वांत मोठी खाडी म्हणून ठाण्याची खाडी ओळखली जाते. या खाडीकिनारी परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे. या कांदळवनाचा ऱ्हास थांबवण्यात कांदळवन क्षेत्राला यश आले आहे. मात्र, तरीही खाडीमध्ये कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सांडपाणी सोडण्यात येते. त्यानंतर खाडीतला कचरा समुद्रात वाहून जाताना तो कांदळवनात अडकतो. यामुळे कांदळवनांचा श्वास गुदमरत आहे. यात झाडांची मुळे झाकली जातात. मुळांवर कचरा जमा झाला की, ऑक्सिजनची मात्रा कमी होते. या सर्व गोष्टींचा विचार करून ऐरोली विभागाकडून स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. यासाठी ऐरोली खाडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातून ऐरोली खाडी परिसरात एक क्विंटल ओला व सुका कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आले, अशी माहिती सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी महेंद्र संप्रे यांनी दिली.