देवगाव येथे जलजीवन योजनेचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगाव येथे जलजीवन योजनेचे भूमिपूजन
देवगाव येथे जलजीवन योजनेचे भूमिपूजन

देवगाव येथे जलजीवन योजनेचे भूमिपूजन

sakal_logo
By

मुरबाड, ता. १२ (बातमीदार) : मुरबाड शहराजवळ असलेल्या देवगाव व साजई येथील लोकांची पाणीटंचाईमधून कायमची सुटका होणार आहे. या दोन्ही ठिकाणी जलजीवन मिशनअंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
मुरबाड तालुक्यातील साजई, देवगाव, मडकेपाडा व कोरवळे या चार गावांमध्ये चार कोटी २२ लाख रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजना आल्या आहेत. गाव स्तरावर सर्वांनी एकत्र मिळून पाणीपुरवठा योजनेकडे लक्ष द्यावे. जेणेकरून आपल्या गावाची पाणीपुरवठा योजना ही कायमस्वरूपी चालली पाहिजे. सर्वांनी या योजनेवर लक्ष देऊन काम करावे, असे आवाहन या वेळी पवार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी मुरबाड पंचायत समिती सभापती स्वरा चौधरी, ठाणे जिल्हा परिषद सदस्य किसन गिरा, माजी सभापती श्रीकांत धुमाळ, पंचायत समिती सदस्य अनिल देसले, सामाजिक कार्यकर्ते मोहन भावार्थे, देवगाव ग्रामपंचायतच्या सरपंच अंजना भांडे तसेच साजई ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक देसले, उपसरपंच करुणा गायकवाड, मुरबाड पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राधेश्याम आडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.