महापालिकेत नवीन ठेकेदारांना संधी द्या : बारोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेत  नवीन ठेकेदारांना संधी द्या : बारोट
महापालिकेत नवीन ठेकेदारांना संधी द्या : बारोट

महापालिकेत नवीन ठेकेदारांना संधी द्या : बारोट

sakal_logo
By

विरार, ता. १२ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२२-२३ दरम्यान होणार असून या निवडणूक यंत्रणेची पूर्व तयारी म्हणून २४ नोव्हेंबरपासून दोन प्रकारच्या निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात एका निविदेत कापडी मंडप, स्टेज, टेबल, खुर्ची, स्टँड फॅन, साउंड सिस्टीम असे साहित्य भाडे तत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी आणि दुसऱ्या निविदेत चहा, नाष्टा असे खाण्यापिण्याचे साहित्य याचा समावेश आहे. यावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी आक्षेप घेतला असून ठेकेदारांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी पालिकेने नवीन ठेकेदारांना संधी देण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. पालिका प्रशासनाने काढलेल्या निविदा प्रक्रियेत लागू केलेल्या अटींवर आक्षेप घेत भाजपचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी महापालिका आयुक्त अनिल पवार यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे की जोपर्यंत नवीन कंत्राटदारांना संधी दिली जात नाही, तोपर्यंत त्यांना निवडणुकीच्या कामाचे अनुभव किंवा दाखले ही मिळणार नाही आणि महापालिकेला आपली मालकी समजून वर्षानुवर्षे महापालिकेची तिजोरी लुटणारे कंत्राटदार भविष्यातही अशीच लूट करत राहतील. त्यामुळेच गणेशोत्सव, छटपूजा व उद्‌घाटन प्रसंगी महापालिकेसाठी कामे करणारे अनेक ठेकेदारांना या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.