बदलापुरात साजरा होणार ‘आगरी महोत्सव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापुरात साजरा होणार ‘आगरी महोत्सव’
बदलापुरात साजरा होणार ‘आगरी महोत्सव’

बदलापुरात साजरा होणार ‘आगरी महोत्सव’

sakal_logo
By

बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : बदलापूर शहरात मोठ्या संख्येने असणाऱ्या आगरी समाजाच्या वतीने कोरोनानंतर यंदा पुन्हा भव्य अशा आगरी महोत्सवाचे शहरात आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक आगरी समाज उन्नती संघटना व आगरी युवा फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात आली.

बदलापूर शहरात आगरी समाज हा मोठ्या संख्येने राहायला आहे. येथील भूमिपुत्र असल्याने या समाजाने शहराच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. आणि मुख्य म्हणजे या समाजाचा एकोपा हा उदाहरण देण्यासारखा आहे. याच अनुषंगाने शहरात दरवर्षी आगरी महोत्सवाचे आयोजन केले जात होते. मात्र, कोरोनामुळे या सगळ्यात व्यत्यय आला. मात्र, आता कोरोनानंतर पुन्हा एकदा आगरी समाजाच्या वतीने दिनांक १६, १७ व १८ डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व कारमेल शाळा परिसरातील, तालुका क्रीडा संकुल येथे या आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहरात वडवली विभागात बांधण्यात येणाऱ्या भव्य अशा आगरीभवनाचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे. या महोत्सवात नागरिकांचे मनोरंजन व्हावे यासाठी, सुप्रसिद्ध ‘चला हवा येऊ द्या’, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक व गायिकांचे ‘आगरी विरासत’, अनेक कलाकार मिळून सादर होणारा ‘बॉलीवूड नाईट’ यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक मान्यवरांना निमंत्रित केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. फक्त आगरी समाजच नव्हे तर तमाम बदलापूरकरांनी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आगरी समाज उन्नती संघटनेचे अध्यक्ष दिलीप बैकर, संघटक शरद म्हात्रे, आगरी युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज मेहेर व कार्याध्यक्ष वामन म्हात्रे यांनी यावेळी केले आहे.