Sun, Jan 29, 2023

ज्ञानपीठ विद्यालयाच्या शिक्षकांचा गौरव
ज्ञानपीठ विद्यालयाच्या शिक्षकांचा गौरव
Published on : 12 December 2022, 11:49 am
ठाणे, ता. १२ (बातमीदार) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानपीठ विद्यालयातील शिक्षक दादासाहेब थोरवे व योगिता देवडे यांचा रोटरी क्लब ठाणे अंतर्गत नेशन बिल्डर अवॉर्डद्वारे आऊटस्टँडिंग टीचर अवॉर्ड हा पुरस्कार देऊ गौरवण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ, ज्ञानपीठ विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.