घरातील आगीत सामान जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरातील आगीत सामान जळून खाक
घरातील आगीत सामान जळून खाक

घरातील आगीत सामान जळून खाक

sakal_logo
By

ठाणे (वार्ताहर) : घोडबंदर रोडवरील अल्पना इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील घराच्या बेडरूममध्ये आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यात कुणीही जखमी झालेले नाही; मात्र वित्तीय नुकसान झाले आहे. ठाण्याच्या विजयनगरी, वाघबिळ, घोडबंदर रोडवरील वसंतलीला कॉम्प्लेक्समधील अल्पना इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर राहणारे गब्रिल शालोम यांच्या बेडरूममध्ये अचानक आग लागली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्यामार्फत विझविण्यात आली. तब्बल तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळाले; मात्र घरातील बेडरूममधील पलंग, कपाट, शोकेस जळून खाक झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाने दिली. आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.