
आझाद मैदानात आंदोलन
सेवेत कायम करण्यासाठी
स्वयंसेवकांचे आंदोलन
मुंबादेवी, ता. १२ (बातमीदार) : स्वच्छ मुंबई मोहिमेअंतर्गत २२ वर्षे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याची मागणी करत अखिल भारतीय श्रमिक एकता युनियनचे अध्यक्ष मोहन देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू आहे. २०११ मध्ये दत्तक वस्ती योजनेअंतर्गत सफाईच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती. त्याअंतर्गत अवघ्या २०० रुपये रोजंदारीवर आजही काम करून घेतले जात आहे. त्याविरोधात महिला आणि पुरुष सफाई स्वयंसेवकांनी आंदोलनादरम्यान आक्रोश व्यक्त केला.
सुमारे २२ वर्षे तुटपुंज्या पैशांमध्ये काम करणाऱ्या ११ हजार २३९ कामगारांना पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नोकरीत कायम करावे, अशी आमची मागणी असल्याचे मोहन देवेंद्र यांनी म्हटले आहे. सफाई कामगारांना आता न्याय मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आझाद मैदानातून शेवटचे गाऱ्हाणे घालत आहोत, असे रोश्णाली रोकडे आणि मिनाज शेख यांनी सांगितले.