वैज्ञानिकांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैज्ञानिकांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग
वैज्ञानिकांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग

वैज्ञानिकांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १२ (बातमीदार) : केंद्र शासनाच्या सूचनेवरून स्वच्छता अभियानात अंबरनाथला केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोटरी सेंटरमध्ये स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लॅबोटरीमधील मुख्य प्रबंधकांसह वैज्ञानिकांनी स्वच्छता करून स्वच्छतेच्या बाबत जनजागृती केली. अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील रक्षा मंत्रालयाच्या रक्षा अनुसंधान आणि विकास संघटन (एनएमआरएल - डीआरडीओ) मध्ये १ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केल्याचे एनएमआरएलचे मुख्य प्रबंधक डॉ. प्रशांत रोजतकर यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत सोमवारी (ता. १२) मुख्य प्रबंधक डॉ. रोजतकर यांच्यासह डॉ. दि. बासू डॉ. इ. मूझेस, डॉ. जी. गुणशेखरन, डॉ. विजय निंबाळकर, विठ्ठल पवार, भरत टपाल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन सफाई मोहिमेत भाग घेतला. त्याचप्रमाणे चिखलोली परिसरातही साफसफाई करण्यात आली.