सिलिंडरच्या स्फोटात पोलिस कर्मचारी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलिंडरच्या स्फोटात पोलिस कर्मचारी जखमी
सिलिंडरच्या स्फोटात पोलिस कर्मचारी जखमी

सिलिंडरच्या स्फोटात पोलिस कर्मचारी जखमी

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : मुंबईतील खेरवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातील एका स्टोअर रूमला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. स्टोअर रूममध्ये कारवाईत जप्त करून ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत खेरवाडी पोलिसांचे सहायक उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले. अरविंद खोत (वय ५७) असे जखमी पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून दुर्घटनेत त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद खोत यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्फोटात भाजल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी दुपारी १२.४७ च्या सुमारास ही आग लागली. त्या वेळी खेरवाडी पोलिस ठाण्यात अनेक पोलिस अधिकारी आणि काही नागरिक उपस्थित होते. अनेक कागदपत्रे आणि साहित्य स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत आग विझविली. जखमीस उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.