दिव्याची समावेश करण्याची मागणी प्रसिद्धीसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्याची समावेश करण्याची मागणी प्रसिद्धीसाठी
दिव्याची समावेश करण्याची मागणी प्रसिद्धीसाठी

दिव्याची समावेश करण्याची मागणी प्रसिद्धीसाठी

sakal_logo
By

दिवा, ता. १३ (बातमीदार) : सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न पेटला आहे. असे असताना त्या विषयाला अनुसरून काहीही संबंध नसताना दिवा ग्रामीण गावांची नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याची मागणी म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप असल्याचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ॲड. आदेश भगत यांनी म्हटले आहे.
जागा हो दिवेकर संस्थेचे विजय भोईर यांनी नुकतेच ठाणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन दिवा ग्रामीण परिसरातील दातिवली, बेतवडे, साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई, पडले, खिडकाळी, शीळ, खार्डी ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करावीत, अशी मागणी केली आहे.
वास्तविक पाहता मागणीकर्ते विजय भोईर हे दिवा गावात वास्तव्यास असून दिवा शहरात एका राजकीय पक्षाचे सक्रिय पदाधिकारी आहेत. भोईर यांनी त्यांचा काहीही संबंध नसताना दिवा ग्रामीण परिसरातील दातिवली, बेतवडे, साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई, पडले, खिडकाळी, शीळ, खार्डी ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केल्यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असल्याचे ॲड. आदेश भगत यांनी सांगितले. मागणीकर्ते भोईर हे ज्या दिवा गावात राहतात त्या गावाचा आणि दिवा शहराचा मागणी केलेल्या पत्रात उल्लेख न केल्याने भोईर यांचा यामागे काही वेगळा हेतू आहे का? याचे स्पष्टीकरण भोईरांनी दिवा ग्रामीण परिसरातील गावकऱ्यांना दिले पाहिजे असे ॲड. आदेश भगत यांचे म्हणणे आहे.

.............................
ठाणे पालिकेकडून अनेक विकासकामे
दिवा शहरात ठाणे महानगरपालिकेकडून अनेक विकासकामे झाली आहेत व मोठ्या प्रमाणात सुरूदेखील आहेत. दिवा शहरात आरोग्य केंद्राचे काम मंजूर झाले असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. शिवाय दिवा शहरात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू असून त्यामध्ये मोफत औषध व तपासणी केली जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर ज्या काही ठिकाणी पाण्याची टंचाई आहे त्या विभागाला मुबलक पाणी मिळणार आहे. या व इतर अनेक सुविधा दिवा शहराला मिळत असल्यामुळेच मागणीकर्ते यांनी दिवा शहर वगळून दिवा ग्रामीण परिसरातील गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करावी, अशी मागणी केल्याचे ॲड. आदेश भगत यांनी म्हटले आहे.