ऐरोली मंत्रालया बस सुरू करण्यास नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोली मंत्रालया बस सुरू करण्यास नकार
ऐरोली मंत्रालया बस सुरू करण्यास नकार

ऐरोली मंत्रालया बस सुरू करण्यास नकार

sakal_logo
By

तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : परिसरातील प्रवाशांसाठी पालिका परिवहन उपक्रमाने ऐरोली ते मंत्रालय अशी बससेवा सुरू केली होती, परंतु कोरोनाच्या महामारीत ही बस सेवा बंद केली. या बस सेवेची वाढती मागणी पाहता नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जी. एस. पाटील यांनी बस सेवा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी दीड महिन्यांपूर्वी केली, परंतु त्यावर परिवहन उपक्रमाने जी. एस. पाटील यांना पत्र देऊन बस सेवा सुरू करण्यास नकार दिला आहे.

ऐरोली ते मंत्रालयदरम्यान ११९ क्रमांकाची बस सेवा एनएमएमटीकडून सुरू होती. यामुळे भांडुप, विक्रोळी, दादर व मंत्रालयात जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रवाशांना त्याचा फायदा होत होता, परंतु कोरोनाच्या संसर्गाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याने पालिका परिवहन उपक्रमाने ही सेवा बंद केली. त्यामुळे ऐरोली व ऐरोली परिसरातील प्रवाशांना आता ट्रेनद्वारे मुंबईतील विविध भागांत मार्गक्रमण करावे लागत आहे. ही सेवा सुरू करण्याची मागणी जी. एस. पाटील यांनी केली होती. यावर बस सुरू करण्यास येणाऱ्या अडचणी विस्तृतपणे परिवहन उपक्रमाचे मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे यांनी मांडल्या आहेत. त्या आशयाचे पत्र जी. एस. पाटील यांना प्राप्त झाले आहे. या पत्रात म्हटले आहे, की ऐरोली ते मंत्रालय ही परत येताना रिकामी चालत होती; तर संध्याकाळी मंत्रालयाकडे जाणारी बस रिकामी धावत होती. त्यामुळे परिवहन उपक्रमाला मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. आगामी काळात बेस्ट परिवहन उपक्रमाचे तिकीट दर वाढवल्यानंतर हा मार्ग सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे यांनी दिले आहे.
--
मुंबईकडे धावणाऱ्या अनेक बसेसचे मार्ग मोठ्या प्रमाणात बंद केले आहेत. तसेच २४ क्रमांकाच्या बसला उत्स्फूर्त प्रतिसाद असतानासुद्धा ही बस बंद केली. यामागे नक्की लॉजिक काय आहे हे कळत नाही.
- जी. एस. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस