पत्रकारांचे वाशी येथे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकारांचे वाशी येथे आंदोलन
पत्रकारांचे वाशी येथे आंदोलन

पत्रकारांचे वाशी येथे आंदोलन

sakal_logo
By

तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटी यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथील पत्रकारावर ठपका ठेवून पोलिसांनी त्याला अटक केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी वाशी येथे आंदोलन केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.

शासन यंत्रणेचा वापर करून पत्रकारांची मुस्कटदाबी करत आहे. लोकशाही मार्गाने लिहिण्याचे, बोलण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हे आंदोलन असल्याची प्रतिक्रिया या वेळी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनात सहभागी पत्रकारांनी हे आंदोलन कोणा एका नेत्याविरोधात नसून प्रवृत्तीविरोधात असल्याचे स्पष्ट केले. यानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळाने कोकण महसूल विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. शासनाकडे याबाबत पत्रकारांच्या भावना पोहोचवण्यात याव्यात, अशी मागणी पत्रकारांनी केली. यानंतर कोकण विभाग माहिती जनसंपर्क उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांची भेट घेऊन त्यांनादेखील पत्रकारांच्या भावना शासनाकडे पोहोचवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यानंतर पोलिस आयुक्त बिपिन कुमार यांच्याकडे निवेदन सोपवण्यात आले.