Mon, Jan 30, 2023

वसतीगृहाला २१ हजारांची मदत
वसतीगृहाला २१ हजारांची मदत
Published on : 13 December 2022, 12:06 pm
तळा, ता. १३ (बातमीदार) ः कुणबी समाजोन्नती संघ मुंबई मुलुंड वसतिगृहासाठी रोवळे ग्रामविकास मंडळ मुंबई यांनी २१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ही रोख रक्कम दिनदर्शिका प्रकाशन सोहळा २०२३ या कार्यक्रमात शाखेच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. कुणबी वसतिगृह मुलुंड येथे बांधले जात आहे. विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा हा याचा हेतू आहे. आजमितीस अनेकांनी सढळहस्ते मदत दिली आहे. आपणही या विद्यार्थी वसतिगृहासाठी सढळ हस्ते आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.