Wed, Feb 8, 2023

सह्याद्री नगरमध्ये कलेचा जागर
सह्याद्री नगरमध्ये कलेचा जागर
Published on : 13 December 2022, 12:35 pm
कांदिवली, ता. १३ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील सह्याद्री नगर येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कलेचा जागर करण्यात आला. या वेळी ७० महिलांनी रांगोळ्या आणि १४१ विद्यार्थ्यांनी चित्रांतून विविध विषय साकारले. विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सहकार परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश मंदिरामध्ये चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संस्कार भारतीसह पोर्ट्रेट रांगोळ्या आणि चित्रकला स्पर्धा तीन गटांत पारप पडल्या. सहभागी कलाकारांनी निसर्गचित्र, वस्तुचित्रांसह अनेक विषय रंगवले.