‘मिस इंडिया’साठी नोंदणी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मिस इंडिया’साठी नोंदणी सुरू
‘मिस इंडिया’साठी नोंदणी सुरू

‘मिस इंडिया’साठी नोंदणी सुरू

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : फेमिना मिस इंडिया २०२३ च्या ५९व्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेशिका स्वीकारल्या जात आहेत. सहभागासाठी निवड चाचणीकरता ऑनलाईन नावनोंदणीसाठी www.missindia.com वर लॉग इन करून अर्ज भरायचा आहे. मोफत फिटनेस प्रमाणपत्र आणि मोफत सेवांसाठी अर्जदार त्यांच्या जवळच्या व्हीएलसीसी केंद्राला भेट देऊ शकतात, असेही कळवण्यात आले आहे. ऑरा फाईन ज्वेलरी आणि रजनीगंधा पर्ल्सद्वारे सह-संचालित मणिपूर टुरिझमद्वारे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा व्हीएलसीसी आणि ट्रेंड्ससह होणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये बेंगळूरु, दिल्ली, मुंबई, गुवाहटी आणि कोलकाता या पाच शहरांमध्ये विभागीय ऑडिशन होतील. ३० राज्य विजेते स्पर्धा बूट शिबिरात सहभागी होतील, ज्यामध्ये कार्यशाळा, फोटो शूट, उप-शीर्षक स्पर्धा, अवॉर्ड नाईट गाला इव्हेंट आणि वैयक्तिक मुलाखती यासह अनेक उपक्रमांचा समावेश असेल.