Tue, Feb 7, 2023

‘ग्रंथाभिसरण’च्या अध्यक्षपदी प्रवीण मथुरे
‘ग्रंथाभिसरण’च्या अध्यक्षपदी प्रवीण मथुरे
Published on : 13 December 2022, 10:51 am
अंबरनाथ, ता. १३ (बातमीदार) : पुढील वर्षी ७५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या आणि सरकारमान्य सार्वजनिक वाचनालय अशी बिरुदावली मिळवलेल्या येथील ग्रंथाभिसरण वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्रवीण मथुरे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी प्रदीप गोसावी, कार्यवाहपदी रवींद्र हरहरे, सहकार्यवाहपदी प्रशांत कर्वे, कोषाध्यक्षपदी राघवेंद्र पाटणकर; तर कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रमोद बोऱ्हाडे, प्रदीप नवार, दीपा गोखले, उमेश कुलकर्णी, सुरेश शेंबेकर आणि विकास नेहते यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून अंबरनाथमधील निवेदक आणि बाल नाट्य दिग्दर्शक जगदीश हडप यांनी कामकाज पाहिले.