Fri, Feb 3, 2023

उत्तनमध्ये गावठी दारु भट्टी उध्वस्त
उत्तनमध्ये गावठी दारु भट्टी उध्वस्त
Published on : 13 December 2022, 11:39 am
भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : उत्तन येथील धावगी परिसरातल्या जंगलात सुरू असलेली गावठी दारूची भट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. यावेळी भट्टी चालवणारे मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले. सहायक पोलिस निरीक्षक महेश मानोरे यांच्या पथकाने धावगी येथील दाट जंगलात सुरू असलेली ही भट्टी शोधून काढली. यावेळी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, रसायनाने भरलेली पिंप पोलिसांनी जप्त केले. भट्टीतून धूर येऊन त्याची माहिती पोलिसांना कळू नये, यासाठी भट्टीसाठी लाकडांऐवजी एलपीजी गॅसचा वापर केला जात होता. दरम्यान, भट्टी चालविणारे दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले असले, तरी त्यांची ओळख पटविण्यात आली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.