नेहा म्हात्रे महाराष्ट्र ऑलिंपिक संघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेहा म्हात्रे महाराष्ट्र ऑलिंपिक संघात
नेहा म्हात्रे महाराष्ट्र ऑलिंपिक संघात

नेहा म्हात्रे महाराष्ट्र ऑलिंपिक संघात

sakal_logo
By

वसई, ता. १३ (बातमीदार) : नागपूर येथे पार पडलेल्या बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उपांत्य सामन्यात ५:० अशा फरकाने नेहा म्हात्रे हिने घवघवीत यश प्राप्त करून महाराष्ट्र ऑलिंपिक संघात स्थान मिळवले आहे. या यशाबद्दल नालासोपारा समुद्रकिनारी असलेल्या कळंब गावातील २३ वर्षीय नेहा हिचे कौतुक केले जात आहे. राष्ट्रीय खेळाडू असलेल्या नेहाने युनिव्हर्सिटी नॅशनल युथ स्पर्धा, युनिव्हर्सिटि लेव्हलला सुवर्ण, रौप्य, रजत पदकांची लयलूट केली आहे. नागपूर येथेदेखील तिने रौप्य पदक मिळवले आहे. कोळी मांगेला समाजातील नेहा हिने बॉक्सिंगसाठी मेहनत घेत यश प्राप्त केले आहे. पोलिस दलात जाऊन देशसेवा करण्याचे माझे स्वप्न आहे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे नेहा म्हात्रे यांनी सांगतिले.