घणसोलीत पावणे तीन लाखांची घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीत पावणे तीन लाखांची घरफोडी
घणसोलीत पावणे तीन लाखांची घरफोडी

घणसोलीत पावणे तीन लाखांची घरफोडी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : घणसोलीतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील बनावट चावीने घरातील सुमारे पावणे तीन लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
घणसोली गावातील सद्‍गुरू हॉस्पिटलजवळच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणारे नितीन भजनावळ याच्या मेव्हण्याचे लग्न असल्याने कुटुंबियासह ५ डिसेंबर रोजी गावी गेले होते. यादरम्यान त्यांच्या बंद घरातून चोरट्यांनी बनावट चावीच्या साह्याने दागिने व रोख रक्कम असे सुमारे पावणे तीन लाखांचे दागिने चोरून नेले. रविवारी सकाळी ६ वाजता नितीन कुटुंबासह घरी परतल्यानंतर त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.