Mon, Feb 6, 2023

पनवेलच्या ग्रामीण भागात गोवरचा रुग्ण
पनवेलच्या ग्रामीण भागात गोवरचा रुग्ण
Published on : 13 December 2022, 1:33 am
नवीन पनवेल, ता. १३ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात गोवरचा एक रुग्ण सापडला आहे. त्याच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पनवेल तालुक्यात सद्यस्थितीत गोवरचे संशयित २३ रुग्ण असून त्यापैकी १ जण पॉझिटिव्ह आला आहे. उलवे येथे एका वर्षाच्या मुलाला गोवरची लागण झाली आहे. तो मुलगा सध्या घरी आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात ९९ टक्के मुलांना गोवरची लस देण्यात आली आहे. ० ते ५ वर्षे वयोगटतील मुलांचे लसीकरण झालेले आहे. तरीदेखील सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती पंचायत समिती पनवेल आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी गोवरचा संशयित रुग्ण सापडला, की पुन्हा परिसरात सर्व्हेला सुरुवात केली जाते.