जासई गव्हाण रस्ता दुरुस्ती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जासई गव्हाण रस्ता दुरुस्ती सुरू
जासई गव्हाण रस्ता दुरुस्ती सुरू

जासई गव्हाण रस्ता दुरुस्ती सुरू

sakal_logo
By

उरण, ता.१२(वार्ताहर) ः उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या मार्गावर अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून हा रस्ता धोकादायक बनला असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिध्द केले होते. या वृत्तामुळे सार्वजनिक विभागाला जाग आली असून जासई -गव्हाण रस्त्याच्या दुरुस्तीला सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता आतातरी खड्डेमुक्त होणार असल्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण झालीआहे.

सार्वजनिक बांधकाम अंतर्गत असणारे रस्ते हे नागरिकांना आपले निश्चित स्थळ गाठण्यासाठी बनवण्यात आले होते. जेएनपीटीच्या अनुषंगाने या परिसराच्या विकासात भर पडू लागली आहे. परंतु, जेएनपीटी आणि नॅशनल हायवेने अवजड वाहतुकीसाठी रस्ते बनवले. मात्र, विकासाचा पसारा वाढल्याने गोदामे एमटी यार्डही सार्वजनिक बांधकाम खात्याने बनवलेल्या रस्त्यालगत साकारण्यात आले. त्यामुळे अवजड वाहतूक या रस्त्यावरून होऊ लागली. परंतु, हे रस्ते अवजड वाहतुकीच्या अनुषंगाने बनवण्यात आलेले नसल्याने रस्ते लवकर खराब होऊ लागले. पावसाळ्यात तर रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. प्रवासी नागरिकांना या मार्गावरून प्रवास करणे जिकरीचे झाले होते.
मात्र, आता ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर जासई-गव्हाण रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता हा रस्ता लवकरच खड्डेमुक्त होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
----
जासई - गव्हाण या मार्गावर नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता हा रस्ता दुरुस्त केला जात आहे. लवकरच मोठा निधी मंजूर करून रस्ता बनवला जाईल.
- नरेश पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता