Tue, Feb 7, 2023

सिलिंडर स्फोटात जखमी उपनिरीक्षकाचा मृत्यू
सिलिंडर स्फोटात जखमी उपनिरीक्षकाचा मृत्यू
Published on : 13 December 2022, 3:31 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईतील खेरवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातील सिलिंडर स्फोटात जखमी पोलिस उपनिरीक्षक अरविंद खोत यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ते ५७ वर्षांचे होते. दुर्घटनेत त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. मुंबईतील खेरवाडी पोलिस ठाण्यात स्टोअर रूमला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. स्टोअर रूममध्ये कारवाईत जप्त करून ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत खेरवाडी पोलिसांचे सहायक उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद खोत यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटात भाजल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती.