Sun, Jan 29, 2023

निवृत्त पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे यांचा सन्मान
निवृत्त पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे यांचा सन्मान
Published on : 14 December 2022, 10:31 am
मुंबई, ता. १४ : पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे (निवृत्त) यांना नुकतेच अथर्व फाऊंडेशनतर्फे अत्याधुनिक कृत्रिम पाय देऊन गौरविण्यात आले. सुर्वे यांचा एक पाय युद्धात निकामी झाला होता. बोरिवलीच्या विट्टी इंटरनॅशनल येथे झालेल्या या कार्यक्रमास सेनादल अधिकारी हजर होते. कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी कारगिल युद्धातही पराक्रम गाजवला होता. भारतीय सेनादलाच्या शौर्याची आणि त्यागाची जाणीव सर्वांनीच सतत ठेवली पाहिजे, असे गौरवोद्गार अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी काढले. राणे यांच्या संकल्पनेतून अथर्व फाऊंडेशनतर्फे देशभरात माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविले जातात. तसेच महिला, मुले आणि तरुणांना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचे उपक्रमही हाती घेतले जातात.