वाघाडी गावात रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघाडी गावात रक्तदान शिबिर
वाघाडी गावात रक्तदान शिबिर

वाघाडी गावात रक्तदान शिबिर

sakal_logo
By

कासा, ता. १४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजसेवक माजी आमदार कै. भाईसाहेब कडू यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त वाघाडी येथे ग्रामपंचायत व कडू कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमानाने भाईसाहेब कडू यांच्या ‘आदिवासी रीतिरिवाज, गाणी’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन समारंभ तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमात विशेष अतिथी तसेच आदिवासी समाज अभ्यासक प्राचार्य भगवानसिंग राजपूत यांनी भाईसाहेब कडू यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, तीन वेळा आमदार असलेल्या कडू यांनी दुर्गम भागांतील आदिवासी समाजाच्या शिक्षणासाठी मोठे प्रयत्न केले. त्यानी आदिवासी समाजातील गोड गाणी लिहून समाज जागृतीचे काम केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी सेवक व शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी अप्पासाहेब भोये म्हणाले की, अहोरात्र कडू यांचे लक्ष आदिवासी समाज शिक्षण कसा घेईल याकडे असायचे. यावेळी कासा पोलिस ठाणे सहायक अधिकारी संदीप पाटील, भिसे विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत ठाकूर, जिल्हा माजी सभापती पांडुरंग बेलकर, डहाणू पंचायत समिती माजी सभापती स्नेहलता सातवी, सरपंच प्रशांत सातवी, उपसरपंच विजयेंद्र कोल्हा, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात वाघाडी गावातली भाईसाहेब कडू यांचा सहवास लाभलेल्या व उच्च शिक्षण प्राप्त नागरिकांचा सन्मान करण्यात आला.