Fri, Feb 3, 2023

वरोती येथे पकडला विषारी साप
वरोती येथे पकडला विषारी साप
Published on : 14 December 2022, 10:13 am
कासा, ता. १४ (बातमीदार) : वरोती येथे झाकीर शेख यांच्या दुकानात एक साप शिरला होता. दुकानातील अडचणीच्या जागेत तो साप बसला होता; पण झाकीर यांनी अथक प्रयत्नानंतर त्या सापाला एका बरणीत भरून ठेवले. कासा येथील सर्पमित्र दृमिल व एस. धानमेहर यांनी या सापाची पाहणी केली असता तो घोणस जातीचा अत्यंत विषारी साप असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सापांना सर्वसामान्यांनी स्पर्श करू नये, त्याऐवजी सर्पमित्रांना बोलवावे, असे आवाहन त्यांनी केले. या सापाला सुरक्षितपणे महालक्ष्मी येथील घनदाट जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.