Sun, Feb 5, 2023

मुंबई कबड्डी संघात भार्गवी
मुंबई कबड्डी संघात भार्गवी
Published on : 14 December 2022, 10:25 am
भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : भाईंदरजवळील राई गावातील भार्गवी म्हात्रे हिची मुंबई उपनगर कवड्डी संघामध्ये निवड झाली आहे. लातूर येथे १५ ते १८ डिसेंबरदरम्यान होत असलेल्या ३३ व्या महाराष्ट्र अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी ती मुंबई संघाकडून खेळणार आहे. मुलुंड येथे नुकतीच मुंबई उपनगर कबड्डी स्पर्धा पार पडली. त्यात भार्गवीची मुंबई संघात निवड झाली. भार्गवी म्हात्रे १३ वर्षांची असून बालयोगी सदानंद बाबा कबड्डी ॲकडमीमध्ये सदानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचे धडे गिरवत आहे. सदानंद पाटील हे मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलात अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ॲकडमीच्या माध्यमातून ते परिसरातील ७० मुलामुलींना मोफत प्रशिक्षण देत आहेत.