Wed, Feb 8, 2023

जोगेश्वरीत मेघवाडी प्रीमियर लीगचे आयोजन
जोगेश्वरीत मेघवाडी प्रीमियर लीगचे आयोजन
Published on : 14 December 2022, 10:37 am
जोगेश्वरी, ता. १४ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्वेत मेघवाडी प्रीमिअर लीग अंतर्गत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (ता. १०) व रविवार (ता. ११) दरम्यान मेघवाडी सार्वजनिक गणेशमंडळ (मेघवाडीचा राजा) मैदान येथे हे सामने खेळवण्यात आले. संतोष मेढेकर, माजी नगरसेवक बाळा नर, सुभाष माजरेकर, संदीप (बापू ) जाधव, नंदू ताम्हाणकर आदी कार्यकर्ते व संघ मालकांनी या लीगचे आयोजन केले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे ज्येष्ठ फलंदाज संदीप पाटील, तसेच आर्किटेक प्रशांत कणिक व डान्स कोरीग्राफर उमेश जाधव उपस्थित होते. या स्पर्धेत मेघवाडी वॉरियर्सने विजय मिळवला, तर मेघवाडी इलेव्हन उपविजेता संघ म्हणून घोषित करण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्यांना संदीप पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.