तोतया पोलिसांनी दोघांना लुबाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोतया पोलिसांनी दोघांना लुबाडले
तोतया पोलिसांनी दोघांना लुबाडले

तोतया पोलिसांनी दोघांना लुबाडले

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : पोलिस असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी दिघा भागातील एका किराणा माल दुकानदाराला गुटखा विक्री करत असल्याचे धमकावून घरातील रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे ६५ हजारांचा किमती ऐवज लुबाडला आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दिघा राम नगरमध्ये कुटुंबासह राहणारे केशरसिंग खरवड (वय ३५) यांचे किराणा मालाचे दुकान आहे. यावेळी त्यांच्या दुकानात दोघे जण पोलिस असल्याचे भासवून आले होते. त्यांनी दुकानात गुटख्याची विक्री होत असल्याचे सांगून झडती घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांनी केशरसिंग यांच्या दुकानाची व घराची झडती घेताना पत्नीचे दागिने व ४० हजारांची रोख रक्कम काढून घेतली. तसेच गुटखा कुठे लपवून ठेवला आहे, यावरून कारवाई करण्याची धमकी दिली. यावेळी केशरसिंग याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आम्ही पोलिस आहोत, असे सांगत त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला होता.
---------------------------------
कोपरखैरणेतही अशीच पुनरावृत्ती
एक्साईज डिपार्टमेंटमधील अधिकारी असल्याचे भासवून शिरवणे एमआयडीसीतील एका किराणा माल दुकानदाराला गुटखा विक्री करत असल्याचे धमकावून घरातून दोन लाख ५८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरण्यात आले होते. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिघा येथे घडलेली घटना व नेरूळच्या शिरवणे भागात घडलेली घटना एकाच दिवशी घडली असल्याने दोन्ही घटनांमधील आरोपी एकच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.