जुचंद्रमध्ये जादा क्षमतेचा उंच जलकुंभ बांधा : कन्हैया भोईर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुचंद्रमध्ये जादा क्षमतेचा उंच जलकुंभ बांधा : कन्हैया भोईर
जुचंद्रमध्ये जादा क्षमतेचा उंच जलकुंभ बांधा : कन्हैया भोईर

जुचंद्रमध्ये जादा क्षमतेचा उंच जलकुंभ बांधा : कन्हैया भोईर

sakal_logo
By

विरार, ता. १४ (बातमीदार) : नायगाव पूर्वेतील जूचंद्र विभागास पाणीपुरवठा करणाऱ्या जूचंद्र जलकुंभाची दुरवस्था झालेली असून सध्या हा जलकुंभ धोकादायक झाला आहे. एक लाख ऐंशी हजार लिटर्स क्षमतेचा हा जलकुंभ २० ते २५ वर्षे जुना आहे. या जलकुंभाचे प्लास्टर व कॉंक्रीटचे तुकडे अधूनमधून पडत असतात. मुख्य म्हणजे या जलकुंभाजवळच पालिकेचे माता बाळ संगोपन केंद्र असल्याने जलकुंभ पडल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. यामुळे जूचंद्र जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने ४० लाखांचा निधी मंजूर असला तरी या धोकादायक जलकुंभाच्या दुरुस्तीऐवजी त्याजागी जास्त क्षमतेचा उंच जलकुंभ बांधण्याची मागणी माजी सभापती कन्हैया भोईर यांनी महापालिका प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. धोकादायक झालेल्या जूचंद्र जलकुंभ हा मुख्य रस्त्यालगत असून याच ठिकाणी दर सोमवारी आठवडा बाजार भरतो. तसेच या धोकादायक जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले असून त्या अनुषंगाने ४० लाख खर्चाचे दुरुस्ती अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले होते, अशी माहिती भोईर यांनी दिली.