लग्नाच्‍या बहाण्याने फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाच्‍या बहाण्याने फसवणूक
लग्नाच्‍या बहाण्याने फसवणूक

लग्नाच्‍या बहाण्याने फसवणूक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १४ (बातमीदार) ः लग्नाच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या भामट्याला मानखुर्द पोलिसांनी बुधवारी (ता. १४) पहाटे अटक केली. अब्दुल खान असे त्याचे नाव असून त्याने तक्रारदार महिलेसह अनेक महिलांना अशाच रितीने जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच त्यांची आर्थिक फसवणूक केल्‍याचे तपासातून समोर आले आहे.
मानखुर्दच्या लल्लुभाई वसाहतीत राहणाऱ्या महिलेने अब्दुल याच्याविरोधात लैंगिक अत्याचार, तसेच आर्थिक फसवणुकीची तक्रार मानखुर्द पोलिस ठाण्यात केली आहे. मालाडच्या मालवणी येथे राहणाऱ्या या तरुणीची चार वर्षांपूर्वी अब्दुलशी समाज माध्यमातून ओळख झाली होती. त्यावेळी अब्दुलने प्रेम करत असल्याचा व लग्न करण्याच्या बहाण्याने महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी त्याने चित्रीकरण देखील केले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती. महिला गरोदर झाल्यावर तिने लग्नाविषयी विचारणा केली. पीडित महिला पोलिसांकडे तक्रार करेल या भीतीने त्याने कोर्टात तिच्याशी विवाह केला; परंतु स्वतःच्या घरी नेण्यास टाळाटाळ केली. तिचा पत्नी म्हणून स्वीकार न करता छळ सुरूच ठेवला, तसेच आर्थिक फायद्यासाठी तिच्याविरोधात २ खोटे गुन्हे देखील नोंदवले. अखेर या त्रासाला कंटाळून महिलेने मानखुर्द पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्याने अशा रीतीने अनेक मुलींची आर्थिक फसवणूक व लैंगिक अत्याचार केल्याचे या तपासात समोर आले आहे.