दोन अवयव दानांतून चार जणांना जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन अवयव दानांतून चार जणांना जीवदान
दोन अवयव दानांतून चार जणांना जीवदान

दोन अवयव दानांतून चार जणांना जीवदान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईत अवयवदानाच्या चळवळीला यंदा गती आली असून या वर्षीचे ४६ वे अवयवदान पार पडले आहे. मुंबईत १२ डिसेंबरला दोन अवयवदानांची नोंद करण्यात आली. मुंबईतील उमराव वोक्हार्ड आणि परळच्या ग्लोबल रुग्णालयात अनुक्रमे ४५ वे आणि ४६ वे अवयवदान पार पडले. या अवयवदानातून चार जणांचे प्राण वाचवण्यास मदत झाली आहे.
उमराव वोक्हार्ड रुग्णालयात ५८ वर्षीय पुरुषाला प्रकृतीच्या काही कारणास्तव दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केल्यावर नातेवाईकांना अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आले. या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या दान करण्यात आल्या. दुसऱ्या घटनेतील ५८ वर्षीय पुरुषाला परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये उपचारादरम्यान डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या व्यक्तीचीही किडनी दान करण्यात आली. या दोन्ही अवयवदानांमुळे चार जणांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचे झेडटीसीसीकडून सांगण्यात आले. या वर्षाअखेरपर्यंत अवयवदान ५० चा आकडा गाठेल, असा विश्वास झेडटीसीसी समन्वयकांनी व्यक्त केला आहे.