Mon, Jan 30, 2023

कुणबी सेवा संघाचा मेळावा
कुणबी सेवा संघाचा मेळावा
Published on : 14 December 2022, 12:44 pm
शिवडी, ता. १४ (बातमीदार) ः अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाच्या वतीने कौटुंबिक मेळावा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’चे आयोजन करण्यात आले आहे. कोकणची पारंपरिक संस्कृती आपल्या खास विनोदी शैलीत समर्थ कृपा प्रोडक्शनचे कलाकार सादर करणार आहेत. संघाचे अध्यक्ष रवी बावकर यांच्या अध्यक्षतेखाली व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता. १८) सकाळी परळ येथील दामोदर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध मान्यवर व्यक्ती, राजकीय नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.