पालघर जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा सन्मान
पालघर जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा सन्मान

पालघर जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा सन्मान

sakal_logo
By

बोईसर, ता. १४ (बातमीदार) जिल्हा परिषद शाळा कर्दळ येथील शिक्षक राजन गरुड व डहाणू तालुक्यातील आगवन नवासाखरा येथील शिल्पा वनमाळी यांना राष्ट्रीय गौरव शिक्षक अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. भारतातील नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी गुजरातमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय शिक्षक नवोपक्रम संमेलनामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुजरातच्या टीम मंथन संस्थेने शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या देशातील १६ राज्यातून १७२ शिक्षकांचा राष्ट्रीय गौरव शिक्षक अवॉर्ड देऊन सन्मान केला. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ११ शिक्षक निवडले गेले होते. यातून पालघर जिल्ह्यातून दोन उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील ऊंझा येथे हा सन्मान सोहळा पार पाडण्यात आला.