समृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट
समृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट

समृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग निर्माण करण्यात येत आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. आता एसटी महामंडळाकडून १५ डिसेंबरला नागपूर ते शिर्डी या मार्गावर बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये ३० आसने आणि १५ शयन आसने आहेत.
ही बससेवा नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ९.०० वाजता सुटेल व पहाटे ५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तास बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रतिव्यक्ती १३०० रुपये व मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना तिकीट दरात १०० टक्के मोफत; तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५० टक्के सवलत असणार आहे.
याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृद्धी महामार्गाद्वारे बससेवा सुरू करण्यात येत आहे. ही बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तास इतकी बचत होणार आहे.
...
नागपूर ते औरंगाबाद
नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती ११०० रुपये व मुलांसाठी ५७५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती ९४५ रुपये व मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे.