गोवरविरोधात पनवेल पालिकेची रणनिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवरविरोधात पनवेल पालिकेची रणनिती
गोवरविरोधात पनवेल पालिकेची रणनिती

गोवरविरोधात पनवेल पालिकेची रणनिती

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १५ (वार्ताहर)ः गोवरची साथ आटोक्यात आणण्यासाठी पनवेल पालिकेने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने आयुक्त गणेश देशमुख यांनी गोवर रूबेलाच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेचे पथक नियुक्ते केले असून विभागावर सर्वेक्षण केले जाणार आहे.
गोवरची साथ आटोक्यात आणण्यासाठी पनवेल महापालिकेने ११ खासगी रुग्णालयांमध्ये गोवर-रूबेलाच्या उपचारासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकात नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थी, आशा वर्कर्स, एएनएम, जीएनएम यांच्या मदतीने गोवर-रूबेलाचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष समन्वयक डॉ. अरुण काटकर यांनी गोवरवरील प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सिटी टास्क फोर्सच्या सदस्य डॉक्टरांनी महापलिकेला गोवर-रूबेलाच्या उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पनवेल कार्यक्षेत्राच्या आसपास गोवर-रूबेलाचे रुग्ण सापडत असल्यामुळे पनवेल कार्यक्षेत्रात येणाऱ्या गोवर-रूबेलाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गोवर-रूबेला निर्मूलनासाठी करावयाच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा केली. तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्याबरोबरच गोवरचे संशयित शोधण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रोज १५० टिमच्या साह्याने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
ः-----------------------------
आशा वर्कर्स, एएनएम, जीएनएम यांच्या माध्यमातून पनवेल परिसरात सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी महापालिकेने खास स्टीकर्स छापले असून सर्वेक्षण झालेल्या घरांवर हे स्टीकर्स लावण्यात येणार आहेत. तसेच गोवर-रूबेलाच्या उपाययोजनांसाठी सामाजिक संस्थांनी महापालिकेला मदत करावी.
- सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महापालिका