Sun, Jan 29, 2023

ठाणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुखपदी सुभाष पवार
ठाणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुखपदी सुभाष पवार
Published on : 15 December 2022, 10:00 am
मुरबाड, ता. १५ (बातमीदार) : बाळासाहेबांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख पदावर ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुभाष पवार हे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचा पूर्ण जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उपनेते प्रकाश पाटील यांनी पवार यांची नियुक्ती केली. त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. माझ्यावर पक्षाने जो विश्वास दाखविला आहे, तो मी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करेन. तसेच या पदाचा पक्षवाढीसाठी, लोकहितासाठी व ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी कसा उपयोग होईल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सुभाष पवार यांनी सांगितले.